पवित्र आवारात दिसे अश्लील चाळे

 

जाता मंदिर, मस्जिदी, गिरिजाघरी

विचार पडतो न्यावी की नाही सोबत लहान मंडळी

दिसे त्या पवित्र आवारात, जागोजागी एकमेकाला खेटून

अश्लील चाळे करत असलेली जोडगोळी

कोणी अपुल्या प्रेमिकेचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढी

तर प्रेमिका आपल्या प्रेमीची लडिवाळपणे ओढी दाढी

 

बाया मंडळी डबे खात तेथे गलका करी

आटोपताच खाण तिथल्या तिथे शतपावले करत फिरी

बसून तिथल्या बेंचवर झाडांची पडलेली फळे खात

तासनतास गप्पागोष्टी करत करे चुगलखोरी

ओट्यावर बसून, रस्ता अडवून, मोबाईल पाहत

दर्शनार्थींना अडचण करे पोरपोरी,

लहान मंडळी कल्लोळ मांडून शांतता भंग करे सारी

भक्तांच्या वाहनांचे कर्कश हॉर्न, कानठळ्या बसत, पडे कानावरी

 

दर्शन, सजदा करण्याच्या ही प्रथा लोकांच्या वेगवेगळ्या

कोणी देवा, मजारी समोरच हात जोडून उभा राही,

तर कोणी मधातच लोटांगण घालून उबडा पडी

वा मुंगीच्या पावलांनी हळूहळू देवा, पिरा भोवती प्रदक्षिणा घाली

अन दर्शन घेणाऱ्यांना त्याच दर्शन होईपर्यंत ताटकळत ठेवी

बर बोलण्याची ही सोय नाही, तयास बोलता, तोच उलट उत्तरे देई

 

प्रत्येक जण स्वतःला देवाचा पक्का शिष्य समजतो

अन दुसऱ्याच्या भक्तीला कमी लेखतो

दर्शन करून, हारफूले वाहून, तिथे डब्बा पार्टी करून

मनात येईल तसा वागतो, जणू देवालाच खरीदतो