पहाट

कोंबडा आरवला

झाली पहाट

बळीराजा शिवारात जायास

लगबगीन तयारीस लागला

 

चुलीच्या धुराचा

धुरकट वास

बैलांच्या घंटींचा मंजुळ नाद

अंगणात सड्याचा साद

होऊन शुचिर्भूत

तयार झाला स्वागतास

सूर्यदेवाच्या आवभगतास

 

जुंपून बैलजोडी

सोबत अवजारे शेतीची

बांधून पाठीशी न्याहारी

निघाला बळीराजा

करण्या पेरणीची तयारी