पहिले धर्मगुरूंची नसबंदी करा

 

कोणता साधू, महंत, मुल्ला, मौलवी म्हणत असेल

दहादहा लेकर पैदा करा“, “खुदा की देन है“,

अशा पाखंडी लोकांना चाबकाने बडवा

अन पहिले यांची नसबंदी करा

 

अरे जे स्वतः काहीही कामधंदा न करता

आरामात साध्याभोळ्या लोकांच्या भरवशावर खातात

अन धर्मशास्त्राचा खोटा अर्थ लावून, लोकांची माथे भडकवितात

त्यांना काय माहित जवाबदाऱ्या काय असतात, कुटुंब काय असते,

संस्कार काय असतात, महागाई काय असते ?

आयत खाऊन, बसल्या जागी, 

काही तरी बेताल वक्तव्य करतात ते

 

 

मित्र हो सावध व्हा अशा लोकांपासून, जे समाजात तेढ माजवितात

सरकारच म्हणन माना, स्वतःचा अन देशाचा विचार करा

कुटुंब नियोजनाचा स्वीकार करा

अन शेर जैसी लाईफजगा