पैशाची भूक

 

डॉलर, रुबल, पाऊंड किंवा टका

प्रत्येक जण पैशासाठी भूका

जरा ही इमानधरम नाही

खाल्लेल्या मिठाला जागल पाहिजे

ही परोपकाराची भावना नाही

ज्याला कुणाला जसा ही मिळतो पैसा

विश्वासघात करून देतो धोका

 

कायदे यांच्यापुढे नांग्या टाकतात

हतबल होऊन खिन्नपणे पाहत राहतात

दुसऱ्या देशाच नागरिकत्व घेऊन

विमानात बसून, “व्हीफॉर व्हिक्टरी म्हणून

पळून जाऊन परदेशात, राजरोसपणे वावरतात

त्याबद्दल कुणी विचारल तर, तेच डोळे वटारतात

 

 

पैशाचा महिमा मोठा

जो तो होतो त्यामागे नतमस्तक

तो कुणी कसा ही मिळवो

त्यासी कुणाला नाही काही देणेघेणे

या भुरट्या चोरांना वाचवून

पांढरपेशे महाचोर ही करतात गुन्हे