प्रत्येकजण एकमेकांवर विसंबून आहे

 

प्रत्येकजण एकमेकांवर विसंबून आहे

हा निसर्गाचाच नियम आहे

मोठा प्राणी लहान प्राण्याची शिकार करतो

लता, वेली मोठ्या वृक्षांच्या अंगाखांदयांवर वाढतो

 

देव ही, मग ते कोणत्या ही धर्माचे असो,

भक्तांवरच अवलंबून असतात

अन भक्त्त ही देवाचीच करुणा भाकतात

पुजारी, खादिम अन पाद्री यांच्या भरवश्यावरच पोटे भरतात

भाविक मंडळीवरच आसपासची

प्रसाद, फुल, फळे अन चहाची दुकाने चालतात

ते दुकानदार ही भक्त्त भरोसेच उदरनिर्वाह करतात

इतकच काय, धर्मस्थळाचा उदभवता वाद,

येऊन प्रकरणे कोर्टात, चालते वकिलांची वकिली व कोर्टाचे कामकाज

करू नये कोणी धर्मस्थळ विद्रुप म्हणून पोलिसांचा पहारा ही लागतो

 

परिसराच्या सुशोभीकरणासाठी नगर पालिकेचा स्वच्छता कार्यक्रम राबतो

अहो इतकच काय, मिळालेल्या देणगीतून

टॅक्स म्हणून सरकार उत्पन्न ही मिळवतो

एकूणच काय सर्वच जण सर्वांवर अवलंबून आहे

हे सर्व जाणून सुद्धा प्रत्येकजण एकमेकाला पाण्यात पाहे