प्रयत्नांती परमेश्वर

 

नका हो नुसते बसू देव देव करत

ठेवा प्रयत्नांवर विश्वास

करा जीवतोड मेहनत

मग पहा, कशी खुलते किस्मत

 

जमान्या भरायच्या पोथ्या वाचल्या

शेंदूर फासला दगडाला

शेकडो नवस बोलला पीर अन मठाला

पण जीवार येते सकाळी उठायला

 

एवढ सर्व मोठ फुर्ताईन केल

मेहनत करन मात्र जीवावर आल

दगडच तो, शेंदूर फासल्यान जीवन नाही रंगणार

अन कागद वाचल्यान ना नोटांची बरसात होणार

 

अंगी ठेवा मेहनतीची वृत्ती

सोडून दया ही आळशी प्रवृत्ती

देवाला पण तुम्ही तुमच्या सारखे समजला

चार आण्याचा शेंदूर लावून जसे तुम्ही त्याला खरीदला

 

मेहनतीची, परोपकाराची बाळगा अंगी भावना

भेटल एवढ ज्याची नसेल तुम्हाला कल्पना

जो करतो मेहनत देव त्यालाच देते फळ

म्हणूनच तर म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर