फसव्या जाहिराती

टाकावी जिकडे नजर

दिसतात भुरळ पडणाऱ्या जाहिराती

दारू, सिगारेट अन गुटखा

ह्या व्यसनांध करणाऱ्या तर अति

कसा हा युवक बिनढोक

भाळतो फसव्या जाहिरातींना

क्षणिक आनंदासाठी

नादी लागतो व्यसनांच्या

जब मिल जाये दो …… “

किंवा मला जे हव असत तेच……”

कस कळत नाही यातल गम्य ?

लागून यांच्या आहारी चूक करतो अक्षम्य

पानठेल्यावर तर दिसतात युवकांचे लोंढे

कुणाच्या हातात गुटखा तर सिगारेट कुणाच्या तोंडे

अहो कसली हि style अन कसला हा रुबाब

खूळसट समजुतीपायी होतो हा तबहा

मोही पडणारे समाजात असतात असंख्य

त्यांना भलावून करावा नेटका प्रपंच

दारू, सिगारेट, गुटखा सवय नव्हे चांगली

भली जिंदगी होते त्यान क्षणात वांगली