बरसताच तुषार धरतीवर
पहिल्या पावसाचे पावसाळ्यात
वाटे जणू कोणी उघडून कुपी अत्तराची
सांडावी जमिनीवर अन पसरावा सुगंध आसमंतात
टपोरे थेंब पडतांना आकाशातून खाली
वाटे वरुणराजा दोन्ही हातांनी
उल्हासाने करून परडी उताणी
जणू उधळे सुगंधित फुले मोगऱ्याची
पडतांना थेंब कौलावर, टिनावर, भांड्यावर
भासे जणू वाजत गाजत येत आहे दिंडी
दारा खिडक्यातून पाहणारी गावकरी सारी
वाटे उभी दर्शनास लक्ष्मीच्या घेऊन हार करी
पडतांना तुषार जमिनीवर
जणू भासे येत आहे लक्ष्मी एकेक पाऊल टाकत
पाण्यासंगे वाहतांना केरकचरा जमिनीवरचा
वाटे जणू वाहत चालली द्वेष, मत्सर अन ईर्षा
अचानक येताच चेहेऱ्यावर तुषार स्वार होऊन वाऱ्यावर
वाटे करीत असावी जलक्रीडा जलराणी
ठेऊन वरुणाने हात कटीवर जलराणीच्या विहारतांना वाऱ्यासंगे
घेऊन ओंजळीत उधळून पाणी