बळीराजा

 

बळीराजा जसा एकदम बरसला

शेतकरी राजा मनोमनी हरीकला

अख्या वर्षाच बजेट लावल त्यान आता

स्वप्नाच्या पूर्तीसाठी जोमान भिडला स्वतः

निंदण, वखरन, खुरपण टूरपण, पेरणी

नाही सवड यातून त्याला

पोटाची भूक विसरून लागला शेताच्या कामाला

भरभरून धान्य येईल, नुपर नसेल कशाची

करी मनी विचार, चिंता मिटेल भविष्याची

पसरावे लागणार नाही हात आता कुणापुढे

न यापुढे आता लाचारीचे जीणे