बाग वसुंधरेची

वसुंधरेच्या बागेत पहा फुलली किती सुंदर फुले

हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई नावे सुंदर तयांची

रंग, भाषा, रितीरिवाज जरी असले भिन्न

वा असली भिन्न शास्त्रे अन धर्माचरणे

नांदती गुण्यागोविंदाने, हे पाहुनी फेडे डोळ्याचे पारणे

येताच संकटे कोणावर ही त्यांचे ते धावून जाणे

असो सण कोणत्या ही धर्माचा ते मंगलगीत गाणे

जणू वृक्षावर वाढावी वेली त्या सम राहणे

एकता अन एकात्मतेची फहरुन ध्वजातोरणे

पेटताच ज्योत अखंडतेची भासे बावनकशी सोने