ताबीज देऊन, अंगारा देऊन अन मारून मंतर
म्हणे करते रोग बरा
कसा लबाडाईच्या आहारी जातो
हा माणूस वेडा
म्हणे येते अंगात, घालवते भूतबाधा
निपुतरालाही म्हणते होईल तुला यंदा
नौकरीसाठी, इस्टेटीसाठी मारते तेथे चकरा
कसा हा अडाणचोट समाज
क्षणिक सुखासाठी बनते बळीचा बकरा
आधुनिक युगात ठेवल आहे आपण पाऊल
याची मात्र त्याला अजून नाही चाहूल
प्रत्येक गोष्टीसाठी आहे सगळी व्यवस्था पुरी
याची त्याला जाणीव का नसावी बरी
उच्च डिग्ऱ्या अन सर्वोच्च शिक्षण घेऊन
माणूस कागदावरच झाला सुशिक्षित भक्कम
आले जरी कॉम्प्युटर त्यावर काढते तो कुंडली
इंटरनेटवर विचारते लेटेस्ट भविष्याची धांदली
एवढ सुशिक्षित होऊन माणूस राहिला अनाडी
स्वतःच स्वतःवर करून घेतो कुरघोडी
सोडा तंत्र–मंत्र, ताबीज, गंडे–दोरे
हाणा बुवाबावाईच्या पाठीवर जोडे
करून नायनाट बुवाबाजीचा
प्रयत्नांची करून पराकाष्टा
भारत देश होईल अवघ्या दुनियेच्या हृदयीचा