बेफाम सुटलय वार

बेफाम सुटलय वार

माणूस माणसास दिसेनास झाल

नीळ आकाश भरभरून आल

धरतीवर अवतरल्या

क्षणात सरी सरसर

बळीराजाचा आनंद

मावेना गगनात

बरसणाऱ्या सरीसवे

पाहे स्वप्न तो डोळ्यात

हरिकल्यावानी विचार डोक्यात

करून मशागत शेतीची

पिकून येती

घामाचे माणिक मोती

चिंब ओले होतांना शिवार

दिसे त्यात त्यास आपल पीक कसदार