भय देवीदेवतांचे

T.V.वर शनिशिंगणापूर देवस्थानात झालेल्या घोटाळ्याची माहिती पाहून

डोक्यावर हातच मारून घेतला

वाटते आता लोकांना शनिदेवाची, त्यांच्या साडेसातीची भीती नाहीशी झालीये

बर, लोकांच ही काही चुकीच नाही

जसे मानवांनी सूर्य, चंद्र, मंगळावर पाय ठेवण्यास सुरुवात केली

तेव्हाच देवांनी ही तेथून पळता पाय काढला

 

जेव्हा त्या ग्रहांवर कोणत्या देवाचे अस्तित्व, त्याचा महाल, त्याच्या दासी नाही दिसल्या

तेव्हा मात्र माणसाच मस्तक ठाणाणल

अन हे देव बिव काही नाही अस्तित्वात नाही, हा सगळा भ्रम आहे त्याला कळल

तेव्हापासून याने पृथ्वीवरच्या यांच्या देवळातल्या मुर्त्यांची गच्ची पकडून

तिथल्या दानपेटीतील रक्कम गायब करण्यास सुरुवात केली

 

कसला देव अन कसल काय सगळा खेळ आहे

आता तर देव ही आपला वाली नाही तो ही त्या ग्रहांवरून केव्हाच अंतर्धान पावला

म्हणून आता आपण पूजाअर्चनेच्या नावावर देवीदेवतांनाही भंडावून सोडतो

अन त्यांच्या नावाच भय दाखवून, कोप होईल अशी अंधश्रदा मनात भरवून

सामान्य माणसांना गंडवितो