भारतीय समाज मोठा मस्त आहे

 

माणूस कसल ही वर्तन करो ते श्रेष्ठ आहे

अन स्त्रीने काही थोड मुलुखावेगळ केल

तर ते समाजाविरुद्ध आहे

 

मुलाने मायबापाला लाथा मारल्या तर त्याच वावग नाही

मुलाला त्याच्या बायकोनच भडकवील म्हणून तो तसा वागला

असे म्हणून मुलीलाच दोष देण्यात समाज पुढे येतो

यात नव ते काही नाही

 

मुलगा किती ही व्यभिचारी असो, कुणावरही अतिप्रसंग करो

तो मुलगाच आहे म्हणून समाज कानाडोळा करतो

मुलगीच तंग कपड्यात राहते, का नाही मुल बिघडणार

असे म्हणून मुलीलाच दोष देतो

 

मुलगी किती ही शिको, कुठल्याही मोठ्या पदावर काम करो

हे बाईचच काम आहेअसे म्हणून तिला घरकाम करायला लावतो

अन मुलगा अनपढ, दिवसभर पानटपरीवर पडला राहून

येणाऱ्याजाणाऱ्या मुलींना छेडतो

पण आज ना उद्या तो काम करेलचम्हणून

त्या दिवट्याचे लाड करतो

 

मुलगी सासरी येऊन घरची सुनबाई बनते

तरी तिला दिवसभर रांधावेच लागते

अन पोरगा बिनकामाचा नवरा बनून, सासऱ्याच्या इथे बसून,

घरजावई बनून फुकटात भाकऱ्या तोडते

 

पोरीन घरची सगळी कामे करायची,

सासूसासऱ्याची सेवा करायची,

नौकरी करून घर सांभाळायच

अन पोरान बार मध्ये जाऊन, दारू पिऊन, गटारात लोळायच

 

भारतीय समाज मोठा मस्त आहे

बाईन डोक्यावर कुंकू लावायच, गळयात मंगळसूत्र घालायच

अन डोक्यावर घुंघट घेऊन स्वतःस झाकून घ्यायच

पोरान मात्र छिद्र पडलेली अंडरपँट घालून मोकाट फिरायच

 

लडकी घर की लक्ष्मी“, “बेटी बचाव, बेटी पढावफक्त नारेच लुभावने

जेव्हा जाता स्त्रीला दिवस तेव्हा घरच्या बडया बुजुर्गाकडून

मुलगा होईल कि मुलगी“, “सुनबाई मुलगाच झाला पाहिजे

कानी पडतात वाक्ये

 

भारतीय समाज मोठा मस्त आहे