भारत देश

 

भारत देश

श्रीमंतांचा देश

पहाव जिकडे

तिकडे करोडोंचाच घोष

निकडीच्या प्रश्नाला

मिळती लाखोचे पोते

जेव्हा खुलते

घोटाळ्यांची पोल

तेथे ही मात्र

करोडो, अरबोचाच बोल

 

 

म्हणतात

निघत होता सोन्याचा धूर

आता वाहतो

सर्वत्र पैशाचा महापूर

एवढ सार असून

नाही शांतता

दररोज

कमविण्यासाठी पैसा

लढतात

बऱ्यावाईट क्लुप्त्या