भाषा देश जोडण्याचे साधन


जेव्हा कोणी हिंदी भाषिक माझ्याशी मराठीत बोलतो

तेव्हा मला त्याचा अभिमान वाटून

त्याच्याबद्दल मनात आपुलकी दाटून येते

व मी जेव्हा हिंदी, गुजराती, सिंधी, पंजाबी किंवा ईतर कोणत्याही भाषेत

त्या त्या राज्याच्या व्यक्तीशी संवाद साधतो

व मला ती भाषा येत असलेली पाहून

त्या राज्याची व्यक्ती जेव्हा माझ्याकडे कृतज्ञतेने पहाते

तेव्हा मन भरून येते


भाषा ही मन जोडण्याचे, देश जोडण्याचे साधन आहे

त्यामुळे प्रत्येक राज्याच्या भाषेचा, तेथील संस्कृतीचा, तेथील प्रजेचा

मान राखलाच पाहिजे


परंतु आज चित्र मोठ विचित्र दिसते

जात, धर्म, पंथ, भाषेच्या नावावर, काही लोक,

आपल्याच देशातील नागरिकांना विभक्त करण्याचा प्रयत्न करताहेत,

त्यांच्यात दुही माजवताहेत

खूपच हृदयद्रावक आहे हे


मित्र हो, नका हो समाजकंटकांच्या बोलण्यात येऊ

प्रत्येकाच्या भाषेचा, तेथील संस्कृतीचा, तिथल्या लोकपरंपरेचा आदर राखून

आपण आपला भारत देश पुढे नेऊ