भीक नका मागू

 

आज मंदिरात दर्शन घेण्या गेलो असता आला मोठा चमत्कारिक अनुभव

मंदिराच्या गेटवरच उभा राहून, जोडे काढून, दर्शन घेतल्यावर जसा जाण्यास निघालो

तसेच गेटवर बसलेले भिकारी भीक मागण्यासाठी हात पुढे करून

साहेब धर्म कराम्हणून पैसे मागू लागले

मी त्यांच्याकडे न पाहताच निघून जाऊ लागलो

तोच त्यातला एक भिकारी मला म्हणू लागला

साहेब तुम्ही बी त देवाले मागालेच आले, तर दया ना मंग मले काही तरी,

तुम्ही देवाले मागता अन आम्ही तुम्हाले

ते उर्मट बोल ऐकून मी चाटच पडलो

नखशिखांत त्या भिकाऱ्याला मी न्याहाळले, मोठा धडधाकट होता तो

कंबरेला दक्षिण भारतीयांसारखी मांडीपर्यंत लुंगी नेसली होती

अंगात बनियान, गळ्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसारखी

भली मोठी जाडजूड स्टीलची चेन घातलेली

अन डोक्यात साईबाबा घालतात तसा दुपट्टा बांधून स्टाईल केली होती

कुत्र चावल म्हणून आपण चावायच नसते

हया नियमागत मी काहीच बोललो नाही

मुकाटपणे आपल्या बाईकवर बसलो व निघालो

मनात त्या भिकाऱ्याला म्हणालो

निदान मी देवासमोर तरी मागतो व सन्मानाने जगतो,

तुझ्यासारखा कुणापुढे हात पसरवून, गयावया करून,

कुणाच्या तुकड्यांवर जगून लोकांच्या नजरेतून तर नाही पडत

 

परंतु मित्र हो, चूक यांची नाही B.P.L. च्या नावावर

यांना मिळू लागल आहे सर्व नाममात्र दरात

त्यामुळे कष्ट करून पैसे मिळविणे विसरली आहे ही जमात