काल T.V. वर एका धार्मिक चॅनल वर
एक कृष्णमार्गी कृष्णटिळा लावलेला
“जीवनपथ” हे नाव असलेल्या त्याच्या कार्यक्रमात
त्याच्या भक्तांना आलेला अनुभव कथन करत होता
तो हसून सांगत होता
“एक श्रीमंत व्यक्ती मंदिरात आला व भगवान श्रीकृष्णाला हात जोडून,
आपल्या खिशातुन पाकीट काढून,
त्यातून रुपये २०००/- च्या नोटांचे बंडल काढून,
देवासमोर ठेवत देवाला प्रार्थना करत म्हणाला
“देवा माझी मनोकामना पूर्ण झाली तर या ही पेक्षा जास्त दान मी तुम्हाला देईन“
हे सांगून तो कृष्णमार्गी कथावाचक आनंदून लोकांना वदला
“असे त्या श्रीमंत माणसाने म्हणताच पटकन त्याचा मोबाईल वाजला,
त्याने मोबाईल उचलला व त्यावर त्याची मनोकामना पूर्ण झाल्याची गोड बातमी मिळाली
तोच त्याने देवाला नमस्कार करून, पटकन बाहेर जाऊन,
A.T.M. मधून भरपूर रक्कम काढून देवाच्या चरणांवर ठेवली“
ऐकून मोठ वाईट वाटल
अहो जी मनोकामना त्या गृहस्थाने देवाला बोलली
ती तर त्याने मनातच बोलली असेल ?
मग त्याच्या मनातल या पोटभऱ्या पुजाऱ्याला कस काय कळल असेल,
तो काय मनकवडा आहे ?
मित्र हो, ही स्वार्थी मंडळी असे प्रसंग रंगवू रंगवू सांगून
तुम्हाला ही याप्रमाणे दान करा म्हणून अप्रत्यक्षपणे सुचवीत असतात
व तुम्ही ते सत्य मानून त्यांच्या बोलण्याला भुलावता
विचार करा, जनावरासारखे वागू नका
सुख–दुःख जीवनात येतातच
एक दिवस ते ही दुःखाचे दिवस निघून जातील
धैर्य धरा, चांगले कर्म करा, गरिबांचे पोट भरा, जनावरांना चारा घाला
अन अशा भोंदू लोकांपासून सावध राहून, जीवनाच कल्याण करा