भगवंत आपली प्रार्थना उशिरा ऐकतो म्हणून
माणसांनी देवाचेच हाल करणे सुरु केले आहे
मंदिरात जातात तर देवाचे हातपाय घट्टपणे पकडून
आपले गाऱ्हाणे सांगतात, त्यामुळे बिचाऱ्या देवांच्या हातापायांची अवस्था
पोलियोग्रस्थांसारखी झाल्याने त्यांच्या हातापायावर
वज्रलेप करण्याची पाळी आली आहे
दर्ग्यात जातात तर त्या कबरीला जोरजोरात दाबत बसतात
अन त्याची चौखट, दरवाजे, खिडक्यांची कमाने
थुंकीन ओले होईपर्यंत चूमत बसतात
एवढच नव्हे, तिथला खादिम, संडासहून आल्यावर आपले हात ही नाही धूत,
तरी ही तिथले जायरीन, त्याच्याही हातावर, आपले माथे रगडत बसतात
देवळात रांगेत उभे असतांना दुरूनच देवाला फुले फेकून मारतात
व देऊन त्याला फुलाचा मार “उघडा म्हणतो बंद डोळे, अन पहा आमच्याकडे,
एक तर आम्हाला वेळ नाही, खूप बिझी आहोत आम्ही,
तरी वेळ काढून आलो तुझ्या द्वारी, तुझ्यासारखे रिकामटेकडे नाही
कि एकाच ठिकाणी बसून, जागेवरच, आम्हास मिळे आयत सर्व काही“
मनुष्य मोठा उतावळा, सर्वकाही त्याला क्षणात हवे
अरे तुम्ही जर म्हणता की देव अंतर्यामी आहे, त्याला सर्वांच दुःख कळते
तर का मग त्याचे हातपाय ओढून, त्याचे अंग दाबून,
त्याला प्रसाद, फुले दुरून फेकून मारून, सांगता आपले दुःख दूर करा म्हणून
नका हो त्या परमेश्वराचे हाल करू
निदान त्याला देवळात, दर्ग्यात, चर्चमध्ये तरी सुखाने दया राहू
तुमच्या हया असल्या माकडचेष्टांना कंटाळला तो
तोच तर तुमचा एक वाली आहे, निदान शांततेने ऐकतो तरी तो
कंटाळून तो का तेथून ही अंतर्धान पावला
तर मग कोण येईल तुमच्या वेदनेवर फुंकर मारायला
मित्र हो, मंदिर, दर्गा, चर्चचे पावित्र्य राखा,
संयम पाळा, शांततेत दर्शन घेऊन त्यांचा कृपाशिर्वाद मिळवा