उत्सव मग तो कोणत्याही देवाचा असो, जातीधर्माचा असो
तो साजरा करतांना दिसतो मोठा उत्साह लोकांमध्ये
जागोजागी आपापल्या धर्माच्या मोठमोठ्या ध्वजपताका
बांधल्या असतात/डौलाने फहरवत असतात
रस्ते, गल्ल्याबोळ झाडून, त्यावर पाणी शिंपडून स्वच्छ केल्या असतात
प्रत्येकाला “प्रसाद खाऊन जा” म्हणून
loudspeaker वर निमंत्रण दिल्या जात
पण काहो ! हे त्याच दिवशी का केल्या जाते ?
लोकांविषयी त्याच दिवशी का आपुलकी बाळगल्या जाते ?
का बाकी दिवशी लोक नसतात का ?
मित्र हो, जसे उत्सवाच्या दिवशी, सणावारांच्या दिवशी
आपण गुण्यागोविंदाने सगळ्यांशी वागतो,
सगळ्या धर्माच्या लोकांविषयी आपुलकी बाळगतो
तशीच आपुलकी वर्षाचे बाराही महिने जर साऱ्या लोकांशी,
मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो
बाळगली तर कुणीच दुःखी राहणार नाही
त्याचप्रमाणे, उत्सवाच्या दिवशी आपण अन्नाचे भंडारे उघडतो,
लोकांना खाऊ घालतो
त्यापरीसच दररोज माणुसकीचा उत्साह साजरा करून
जर गोरगरिबांना खाऊ घातले तर कुणीच उपाशी राहणार नाही
व आपल्या देशात दारिद्रयाचे चित्र दिसणार नाही
तसेच प्रत्येकाला जात–धर्माचा चष्मा सोडून आपुलकीने पहिले तर
समाजात तेढ माजणार नाही, वादंग होणार नाही
जसे उत्सवाच्या दिवशी देवा–पीरा समोर, मंदिर–मस्जिदीसमोर
देवा–पिराच्या नावाने आनंदाने नाचता
त्यापरीसच गरिबांना खाऊ घालून, जातीभेद विसरून,
प्रत्येकाला आपले समजून, एकमेकांना गळे मिळून,
माणुसकीचा उत्सव मनवून,
जातीभेद, धर्मभेद मिटविल्याचा उत्साह साजरा करून
आनंदाने झिंगझिंगाट करून नाचा
तोच तर खरा धर्म नाही तर सगळ व्यर्थ