माझा मित्र मला म्हणाला मी घरी लघुरुद्र करणार आहे
परंतु लगेचच तो पुढे मला हेही म्हणाला
“पण का रे लघुरुद्र केल्याने खरच आपली मनोकामना पूर्ण होते का ?
ते एकूण मला राग आला व रागानेच मी त्याला म्हणालो
“मित्रा तुझ्या मनात भावच नाही तर कशाला लघुरुद्र करतो,
अरे कुठली ही पूजा मनात काही हेतू ठेवून केल्याने ती तात्काळ फलद्रुप
थोडी होणार आहे“
ती काय ऍलोपॅथीची गोळी आहे घेताच काही तासात बरे वाटू लागेल
त्यासाठी तुमच कर्म ही शुभ हव
तुम्ही घरी पूजा करता अन मनात लोकांबद्दल हीन भावना बाळगता
पूजा करतेवेळी सुद्धा तुमच मन शुद्ध नसते
त्यावेळी सुद्धा खरच पूजा केल्याने चांगल होत असते का ?अस विचारता
अरे कुठलीही पूजा–अर्चा करतेवेळी पहिले मन शांत ठेवा,
लोकांबद्दल परोपकाराची भावना ठेवा,
देवावर श्रद्धा ठेवा
अन पूजेच तात्काळ फळ मिळाल पाहिजे ही भावना मनी ठेवू नका
कारण पूजेचे फळ हे आपल्या प्रारब्धाच्या पाप–पुण्यानुसार मिळत असते
पदरी पुण्यच नसेल तर किती ही पूजा करा काहीच प्राप्त होणार नाही
मात्र एवढे नक्की पूजा, यज्ञयाग करून त्यात तुमचे पाप जळून राख होणार आहेत
शेवटी वंदनीय तुकडोजी महाराजांच्या शब्दात सांगावयाचे तर
“मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव“