मनुष्याची बनवाबनवी

 

सुख प्राप्त करण्यासाठी

मनुष्य करतो बनवाबनवी

इप्सित साध्य झाल्यावर

मात्र तीस पायदळी तुडवी

 

उतरावा कर्जाचा डोंगर डोक्यावरुनी

म्हणून माशास घाली कणकेचे गोळे

झाल्यावर क्षालन कर्जाचे

हा मात्र तीसच गिळे

घरात नांदावी शांती

म्हणून करावी सेवा मातापित्याची

साधूसंत सांगती

हा मात्र जिवंतपणी मारून जोडे

मेल्यावर श्राध्द करून, दरवर्षी श्राध्दपक्षी

उठवून पंगता त्यांचे ऋण फेडे

रहावी हातास बरकत

म्हणून दयावा पशूस चारा

हे सत्य असे त्रिवारा

पण हा सर्व साध्य होताच

घाली झाडा-झुडुपांवर कुऱ्हाडीचा मारा

 

पण यास एव्हढेही समजत नाही

ज्यावर विसंबून आपण साध्य केले जे काही

देतो त्याचाच बळी, पण,

त्यांच्या जीवावर खेळलेली खेळी

टिकणार आहे थोडी