मन ही मोठ सैरभैर
धावे इकडून तिकडे
आता इथे तर क्षणात क्षितिजापलीकडे
कधी झुडुपाआड तर कधी डोंगरापार
मन मोठ अथांग अन हळव
जशी हवेची हृदयस्पर्शी झुळूक
तर कधी उथळत्या पाण्याचा खळखळाट
कधी उडे फुलपाखरू बनून
तर कधी थांबे काही चुकलो समजून
मन मोठ अबोध बालकापरी
करी चाळे आपल्याच लहरी
कधी क्षणात उन्मादून बहरी
मन जणू हे इंद्रधनुसारखे
वेगवेगळ्या रंगात खुले
मनोराज्यात बहरून
कधी मनःतुषारात न्हाऊन धुले
कधी हे आठवणीत, इतिहासात जाऊन होय जुने
तर कधी उद्याच्या आशेने पालवी बनून फुले
मन मोठ अथांग जणू समुद्रापरी
त्यात विहारी निराशेचे व्हेलसारखे जलचरी
तर कधी वाहे, घेऊन कवेत, बनून आशेची जलपरी