काय घाणेरड्या शिव्या देता, कुणाचे हात–पाय तोडता, जीव घेता
बेदरकारपणे वाहने चालवून, अपघातात आपले अवयव निकामी करून,
स्वतःच स्वतःच्या जीवाची नासाडी करून, शरीरात लोखंडी रॉड बसवून घेता
अरे वागा माणसापरीस, सोडा जनावरासम जीणे अन करा अवयवदानाचा संकल्प
मरणोत्तर करून आपले अवयव दान, पाहू दया गरजवंतास ही पृथ्वी छान
करून डोळे दान, करा कुणाचे दूर अंधत्व
अन अस्थी, मज्जा रोपण करून, करून आपले हात–पाय दान
उभे करून दिव्यांगास त्याच्या पायावर, दूर करा त्याचे पंगुत्व
उगीच द्वेषापोटी नका कुणाच्या देहाचे लचके तोडू
चला अवयव दान करून “मरून कीर्तिरूपे उरू“