मला गर्व आहे

 

मला गर्व आहे छत्रपती शिवरायांचा

ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी प्राण वेचला

ज्यांच्या अंगी होता प्रचंड हौसला

माय बहिणींच्या, मायभूच्या अब्रूसाठी

इंग्रज अन मोगलासारखा शत्रु

पालापाचोळ्यागत पायाखाली ठेचला

 

 

गर्व आहे मला स्वामी विवेकानंदांचा

त्या वैराग्याने पदरी कुठले ही उच्च शिक्षण नसतांना

अमेरिकेत साऱ्या जगतविद्वानांसमोर

आपल्या अमोघ वाणीने

अध्यात्माची वाचली गाथा

करून सर्वांस मंत्रमुग्ध

देशी परतला होऊन जगज्जेता

 

 

गर्व आहे मला भगवान बुध्दांचा

ज्याने आपला राजप्रासाद त्यागून

समाजोद्धाराचा कंटिकाकर्ण मार्ग पत्करून

जगी विखुरला बोधीवृक्षाची सावली बनून

मनोभावे नमन त्या महामानवास

बुध्दम शरणं गच्छामिम्हणून