मला नको तो राम

 

मला नको तो राम

हवे हाताला काम

तोंडी खुशीचा जाम

अन भयमुक्त्त शाम

 

नको मंदिर, मस्जिद

आता हवा एकोपा

जे घालून हातात हात

पळवी जातिद्वेषाच्या प्रकोपा

 

 

नको महाआरती वा नमाज

हवी अशी माणसे

जे भुलवून किल्मिष

घडवी नवा समाज

 

नको ते आरक्षण

हवी ती मानसिकता

जी गुणवंतास प्राधान्य देऊन

देश करेल भक्कम, सक्षम

 

नको तो राम, रहीम

जातीभेद, आरक्षण वा

देशद्रोहयांच्या नावाचे कुठल्या रस्त्याला पाषाण

ज्याने होई देशाचे स्मशान

 

मला नको तो राम

हवे हाताला काम