मशाल परिवर्तनाची

 

जेव्हा जिद्द येईल अंगी

तेव्हा बळ येईल उडण्याचे

झुगारून अज्ञान, अंधःकार, तिमिराच्या चालीरीती

स्वतःस सुसंस्कृत घडविण्याचे

 

 

ओळखा साधू भोंदूंचा दांभिकपणा

मोडा उचनीच, जातिभेदाचा कणा

अमंगळातून निघून जे निर्मळ येईल त्यास आपले म्हणा

कवटाळून हृदयाशी अवघ्या जना

 

हा करेल, तो करेल का कोणाच्या करण्याची वाट पाहता

होईल काही चमत्कार म्हणून दगडासारखे बसून राहता

उचला पाऊल धरा मशाल परिवर्तनाची

बघा होऊन बदल कसा मेळ साधतो आधुनिकतेशी