माणसांची अंधश्रद्धा

 

धरतीवर माणसांची अंधश्रद्धा,

त्यांचा तो अतिदैववाद,

मंदिरमस्जिदीसाठी भांडण,

प्रसंगी रक्त सांडण

जागोजागी पैशासाठी भक्तांची लुबाडणूक

ढोंगी बाबांना देव समजून

त्यांच्या भूलथापांना ते बळी पडण

हे पाहून तो आकाशातला देव ही भिला

धरतीवरून स्वतःच अस्तित्व लपविण्यासाठी

तो ही धडपडू लागला

हळूहळू तो ही वितळू लागला,

आपल रूप कमी करू लागला

कुठे पुराच्या पाण्यात स्वतःला वाहून घेऊ लागला

तर कधी

माणसांचा स्वतःस स्पर्श होऊ नये म्हणून

कोर्टात जाऊन स्वतःस झाकून घेण्याचा आदेश मागू लागला

पराकोटीचा त्याच्या नावावर चाललेला

स्वैराचार, नरबळी व कु चालीरीती पाहून

तो ही येथून काढता पाय घेण्यास पळवाटा शोधू लागला