माणसाची भूतदया

 

माणसाची भूतदया पहा कशी आहे

चारचाकी गाड्यांवर मोठ्या अक्षरात लिहिले असते

जियो और जिने दोवा पोथीपुराणातल्या ओळी

अन भरधाव वाहने चालवून घेती निरापराधांचा बळी

 

 

घराचे नामकरण केले असते वैकुंठ सदनवा शांती भवन

घरात मात्र सदैव भांडण अन कटकटी

आपल चांगल व्हाव अन दुसऱ्याच वाईट यासाठी काळी जादू करून

ठेवती आपली वृत्ती कपटी

 

 

आपली श्रीमंती दाखविण्यास हा मित्रांवर अफाट खर्च करी

चारचौघांना दिसेल अशा महागड्या वस्तू आणून ठेवे दारी

न दिसे त्यास बेसहारा, गरीब, अबला नारी

वाममार्गात घाली अख्खी हयात सारी

 

 

मुखी नाम परमेश्वराचे, अंगावर लाल, काळे धागे जमानाभराचे

यात्रा, उर्स, कीर्तनाला हिरीरीने जाई

घरी येताच सत्कर्म विसरून, एकमेकाला पाण्यात पाही