माणूस

 

किती नालायक हा माणूस ?

माहित असते त्याला दारून होते बर्बाद

काही कामाची नाही ते गोठ

तरी पण प्यायला शिवतात त्याचे ओठ

 

दररोज पेपरात येतात बातम्या

दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून दिला जीव…..”

दारूसाठी मंगळसूत्र ठेवल गहान…..”

किती निरढोक बनला हा

दारूपायी लाखमोलाच्या जीवाची त्याला नाही आन

 

बायको रागावली तर

खाते लेकराबाळायच्या खोट्या शपथा

धरते हातात देव

दूसऱ्या दिवशी मात्र सगळ विसरून

दुकानदाराला म्हणते ५० मि.ली. देव

 

नाही याला काळजी स्वतःची

मात्र दारूच्याशौकापायी खावून खोट्या शपथा

करते बर्बादी लेकराबाळायची

 

काय कामाचा असा माणूस, हा तर आहे समाजावर कलंक

बाप राजेहो, पिऊ नका दारू

होते त्यान सर्वस्वाचा अंत