माणूस

भरवसा नाही क्षणाचा

न मिळे मानव जन्म पुन्हा

क्षणिक स्वार्थासाठी मानव

पहा करतो अक्षम्य गुन्हा

लांड्यालबाड्या, हेवेदावे

करी कुरघोडी इतरांवरी

इंगीतइप्सीत साधण्या

प्रसंगी उठे जीवावरी

अहंपणा, मीपणा

अश्वत्थाम्याप्रमाणे जखम मस्तकावरी

असून बुध्दी हा वागे पशुपरी

बरे झाले न झाला मानव अजरामर

जी थोडी काय मनी भिती विध्यात्याची

सारुनी दूर बाजूला तयाला

असता माजला असुरापरी