मानवाचे दांभिकपणाचे आयुष्य

 

स्वर्गनर्क आहे कि नाही पता नाही

पण मानवाने धरतीवरून मेल्यावर

स्वर्गात जायची तयारी करून ठेवली आहे

दिवसा पाप करतो अन संध्याकाळी मंदिरात जाऊन

महादेवाच्या पिंडीला लोटाभर पाणी घालून पापक्षालन करतो

 

 

आपले कर्म वाईट जाऊ नरकात माहित असून ही

मेल्यावर स्वर्ग रथनाव लिहिलेल्या चार चाकी गाडीवरून

मसनात जाऊन स्वतःस स्वर्गयात्राघडवून आणतो

काशीला जाऊन पंडितांच्या हातून श्राद्धकर्म करून

मोक्ष मिळाल्याचे समाधान प्राप्त करून घेतो

 

 

पाणपोया, धर्मशाळा बांधून, त्यावर स्वतःचे नाव लिहून,

स्वतःस दानशूर म्हणून संबोधून घेतो

मंदिरमस्जिदीवर टिनाचे छत टाकून स्वतःस धार्मिक म्हणवून घेतो

मंडपात स्वर्गीय आप्तांच्या फोटोवर गंधाचे टिळे लावून

त्यांच्या नावे धार्मिक उत्सवाचे आयोजन करून घेतो

आयुष्यभर दांभिकपणाचे आयुष्य जगतो अन शेवटी

रित्या हाताने यमसदनी जातो