मानव असमाधानी का ?

 

मानवाच्या गळ्यात तावीज, रुद्राक्षाच्या माळा,

मनगटावर मंतरलेले लाल, पिवळे, काळे धागे,

बोटात नवग्रहांच्या अंगठ्या,

घरातून बाहेर जातांना पहिले देवाला हात जोडतो,

दर्ग्यात सजदा करतो,

शिंक आली की देवाचे, अल्लाचे, गॉडचे नाव उच्चारतो

 

प्रश्न पडतो? मग एवढ करूनही तो असमाधानी,

वैफल्यग्रस्त अन सदैव संकटात का सापडलेला असतो ?

सगळेच, देवाचे, अल्लाचे, गॉडचे परमभक्त आहेत

तर एकमेकांना का तो पाण्यात पाहतो,

दुसऱ्याच सुख पाहून दुःखी का होतो ?

 

मला तर वाटते आपल्याला देव, अल्ला, गॉड समजलाच नाही

फक्त मंदिर, मस्जिद, चर्चमधील मूर्त्यांना आपण पुजतो

त्यांचे धर्मग्रंथ आंधळ्यागत, त्यातला मर्म न समजता,

केवळ वाचाळासारखे वाचतो

 

देवासमोर पूजा, प्रेअर वा सजदा केल्याने आपण अजय झालो

आता आपल्याला कुठलीही शक्ती पराजित करू शकत नाही

हा अहंभाव मनी बाळगून बेदरकारपणे वागतो,

कुणाचा आत्मा दुखेल असे वर्तन करतो अन तेथेच चूक करतो

अन हीच चूक, आपल्या मागे, शाप बनून झोंबवतो

 

देव तर भक्तांच सदैव हितच चिंतत असतो

पण जेव्हा मानव त्याच्या आशीर्वादाचा गैरफायदा घेतो

तेव्हा त्याला जमिनीवर आणण्यासाठी

संकटाच्या महाजालात गुरफटवून

वेदना, त्रास काय असतो, हे तो समजवून देतो

व त्याच्याकडून दोनचार सत्कर्मे करून घेतो

 

म्हणून, मित्र हो, जसा देवाचा आदर करता

तसा इतरांचा देखील सन्मान राखा

भगवान के घर देर है, अंधेर नहीहे फक्त विसरू नका