आम्ही देवास ही मार्केटचा ब्रँड केला
जातो सतराशेसाठ मंदिर–दर्ग्यात
एका देवाजवळ गुण नाही आला तर कुणा व्यक्तीने
त्याच्या “स्वामी“, “बाबांबद्दल” सांगितलेले अनुभव ऐकून
आपण मानत असलेल्या देवाबद्दल
पटकन आपले मतपरिवर्तन करून
त्या “महाराजांना” नाव ठेवून
जसा नवीन प्रॉडक्ट बाजारात लॉन्च होताच
त्या प्रॉडक्टचे आधुनिक फिचर पाहून
जशी आपण जुनी वस्तू फेकून नवीन घेतो
तसेच कुणाचे तो त्याला मानत असलेल्या
देवा–पीराबद्दलचे चमत्कार ऐकून
आपण पूजत असलेला देव
पटकन आपली मनोकामना पूर्ण करत नाही हे पाहून
दुसऱ्याच ऐकून आपला देव सोडून,
लवकर पावत असलेल्या तथाकथित देवाकडे धाव घेतो
आपल्या जवळ जराही सबुरी नाही
“देवाजवळ देर है अंधेर नही, वक्त आनेपर सब मिलेगा“
या तत्वावर विश्वास नाही
कलियुग आहे देवास ही आपण मशीनच समजतो
अन त्याच्याजवळ प्रसाद ठेवून, पूजा करून
देवान आपल्याला क्षणात सर्व काही दिल पाहिजे
हेच समजतो
देवाच सोंग अंगात आणणाऱ्या
तांत्रिक–मांत्रिका सारख्या विदुषकाला पुजतो
अन मंदिरातल्या मूर्तीकडे पाहण्याचे ही टाळतो
हाच तांत्रिक–मांत्रिक देवाचे फोटो ताटात ठेवून,
त्यावर हळद, कुंकू वाहून, त्यांच्यासमोर उदबत्ती लावून
इष्टदेवतांना बाजारात लोकांसमोर दरदरचा भिकारी करून
भिकाऱ्यागत भीक मागण्यास घुमवितो
भरपूर भीक मिळताच
ते देवाचे फोटो ठेवलेले ताट मुतारीसमोर घाणेत ठेवून
त्यांच्यासमोर निवांतपणे धूर सोडत बिड्या पितो
जस वस्तूच रॅपर काढून उकिरड्यावर फेकतो
तसच एका देवाजवळ गुण नाही आला तर
दुसऱ्या देवाजवळ जातो अन देवाचे हाल करतो