मार्ग

 

युवकांनी शोधलाय राजमार्ग बिनधास्त जगण्याचा

नशा, धूम्रपान अन तंबाखू चघळून

भ्रामक समजुतीपायी बहुमोल जीवन

क्षणात उध्वस्त करण्याचा

 

कसा हा उच्च शिक्षित युवक ?

केवळ डिग्र्या घेऊन झाला सुशिक्षित

बऱ्यावाईटाची जाण नसे त्याला

न कळे होत असे हानी त्याने अपरिमित

 

करावा लागतो प्रचार, चर्चासत्रे अन संमेलने

उचलावी लागतात बळजबरीने बंदीची पाऊले

व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली

उच्छाद मांडती हि सुशिक्षित आधुनिक बाहुले

 

सूटबूट, टाय केवळ पेहेरावाच वेगळा

भोगवादी प्रवृत्तीकडे ओघ यांचा सगळा

टाकावी नजर जेव्हा सहज रस्त्यांवर

दिसे पसरला व्यसनांधतेचा ज्वर

 

कसली हि तरुणाई अन कसले हे शिक्षण

कळत नाही कसे करावे षड्रिपूंपासून रक्षण

नादी लागून क्षणिक आनंदासाठी

करून घेतो स्वतःचे अवलक्षण

 

व्हा जागे ! पहा स्वतःकडे

सोडून नाद व्यसनांचा

व्यसनमुक्त समाज करून

उघडू ज्ञानाची कवाडे