मुक्या जीवाची बद्द्दुआ

 

प्रत्येक धर्म प्राणीमात्रावर दया करा म्हणून सांगतो

पण आपण खुदा, प्रभू, गॉड के बंदे

मांसाहार करून, माणसाचीच हत्या करून

त्यात सांगितलेल्या शिकवणीला हरताळ फासतो

 

मनोकामना पूर्ण झाली तर मरीमायला बोकडाचा बळी देतो,

नवरात्रात देवीला मासोळीचा नैवेदय दाखवितो,

बकरी ईदला शेळ्यामेंढ्या कापून रक्ताचा पाट वाहतो

अन ख्रिसमसला मटणाची पार्टी झोडतो

इतकच नाही, गाय लागली मरणपंथाला

तर मरी गायब्राह्मणाला दान देतो

 

टी. बी. झाला असता स्वतःचा जीव वाचविण्या कोण्या वैदूकडे जाऊन

मासोळीच्या तोंडात औषध टाकून जिवंत मासोळी गिटकतो,

सुंदर दिसण्यासाठी जनावरांच्या चरबीपासून तयार केलेली सौंदर्यप्रसाधने वापरतो

अन संधिवात विकारावर हातापायावर चोळण्यासाठी शार्कमारून तेल मिळवितो

 

आपल्या धर्मातील देव, पीर, सेंट यांच्याजवळचे

गुटगुटीत प्राणी, पक्षी पाहून आपण भाळतो,

त्यांच्या शक्तिस्थळी जाऊन त्या पशुपक्षांना दाणे टाकतो

हा या साधूबाबाचा प्रिय पक्षी, हा या पीराचा प्रिय प्राणी,

आमचे गॉड मेंढपाळ बनून मुक्या जीवांची कशी घ्यायचे काळजी

करून स्तुती मोठ्या अभिमानाने आपल्या देवाची महती सांगतो

 

आपला देव अन त्याची शिकवण,

त्याने शिकविलेली प्राणिमात्रा अन विश्वबंधुता

नका धर्मग्रंथात बंदिस्त करू

धर्मग्रंथातल्या साराचे मर्म घ्या जाणून,

त्याचा खरा अर्थ घ्या समजून

नका ठेवू कोणाशी अबोला, सगळ्यांना आपले माना

कोणाचा जीव घ्याल अन त्याला खाल

तर लक्षात ठेवा नक्कीच त्याची बद्द्दुआ प्राप्त कराल