मौजे खातर

मौज म्हणुनी घेतला, हौसे खातर मित्रांच्या

एक प्याला

मारुनी घेतला जीवावर

विनाशाचा घाला

लागली लत, बुडाली पत

मित्रही झाले मृगजळ

दारूच्या ह्या एक प्याल्यापाई

उभ्या आयुष्याला लागली घरघर

जवळचे म्हणविणारे मित्र

पळाले दूर इतरत्र

नातेवाईकांनी ही केले वर हात

एकेकाळचा सधन मी

आजमात्र फाटक्यात पाय

घर गेल, संसार गेला, गेल सर्व काही

मौजे खातर घेतला प्याला

आता तोच माझी मौज पाही