यशाच श्रेय "उपरवाल्याला" नका देऊ

 

जगप्रसिद्ध कलाकार, उद्योगपती, नामांकित डॉक्टर, ऍक्टर

यांना माझी एकच विनंती आहे

कृपया तुम्ही मनगटावर लाल, काळे धागे बांधून,

कपाळावर वेगवेगळे टिळे लावून,

अंगाखांद्यावर वेगवेगळ्या देवाची नावे मिरवून, मंत्र लिहून

तुमच्या यशाच श्रेय उपरवाल्यालानका देवू 

 

ते यश तुम्हाला तुमच्या हुशारीमुळे, कौशल्यामुळे, कामातील नियोजनामुळे

अन तुमच्यातील जिद्दीमुळे मिळाल आहे हे लक्षात ठेवा

कारण तुमचेच अनुकरण सामान्य माणूस ही करत असतो

तो तुमच्यासारखाच वागण्याचा प्रयत्न करीत असतो

 

तुमच्या ये सब उपरवाले कि दया हैअस म्हंटल्याने त्याला ही वाटते

हे प्रचंड यशस्वी लोकच जर आपल्या यशाच श्रेय देवाला देतात

म्हणजे किस्मतच सगळ काही आहे, “मेहनतव्यर्थ आहे

व ते सुध्दा तुमच्यासारखे हातापायावर वेगवेगळ्या रंगाचे धागे बांधून,

गळ्यात वेगवेगळ्या माळा घालून,

कपाळावर कुठल्यातरी रंगाने बोटाने टिळे मारून,

देवाला 

मला ही या सेलेब्रेटींसारखच यश दे” म्हणून गळ घालत असतात

 

हे प्रसिद्ध व्यक्तिंनो, सामान्य लोकांना,

यश मिळविण्याकरिता तुम्ही काय मेहनत घेतली,

काय संघर्ष केला ते सांगा

परंतु हातात देवधर्माचे धागे बांधून, वेगवेगळ्या धर्मालयात,

हिमालयात मिरवून, पालखीत बसून

देवानेच आम्हाला हे यश दिल

अस कृपा करून सांगू नका व सामान्य जनतेची दिशाभूल करू नका

हात जोडतो, जनतेला मूर्ख बनवू नका