येताच कुठली ही विघ्ने
भक्त्त उधळती देवाची स्तुतीसुमने
तयासमोर स्वतःस समजती अजाण
समजून त्यास बुद्धिदाता
बोलून बोल लाघवे
मात्र होताच सगळे चांगले
भक्त्त करिती देवास वेगळे
करून पापावर पाप
जोडून हात, खाऊ घालून प्रसाद दूध, भात
मारून डुबकी गंगेत
पापक्षालन झाल्याचे समजून
स्वतःसच बुद्धिमान समजून
काढी त्या देवासच मुर्खात
मनुष्य मोठा स्वार्थी प्राणी
स्वार्थ साधण्या घेई कुणाचा आधार
अन कार्यभार साधल्यावर
घेई घोट नरड्याचा करून त्यावर वार