रंग बदलती दुनिया

 

पहा मनुष्य कसा रंग बदलतो

सरड्या सारखा क्षणाक्षणाला

स्वार्थ साधण्या बळी देऊन इतरांचा

धूर्त म्हणवून मिरवितो आपणाला

 

बळेच आणितो आव आपलेपणाचा

गोड बोलून, शिरून पोटात

कपटीपणाला देतो मुलामा ओलेपणाचा

दिखाऊपणा करून मदतीचा

अन कांगावा करून आतिथ्याचा

आस्तिनात लपवून कट्यार

शोधी वेळ करण्यास वार

 

स्वार्थापुढे तयास नसे

चाड माणुसकीची अन नात्याची

अन नसे जाणीव खाल्लेल्या अन्नाची

येताच घटका, घेई घोट नरड्याचा