राजमार्ग

समाजाची शांतता धोक्यात आणण्यासाठी

कंटकांनी शोधलाय राजमार्ग

महात्म्यांच्या पुतळ्यांची विटंबना करून

समाजात माजवायचा वादंग

 

किती निचतेवर उतरला माणूस ?

आठवत नाही तयास

त्या महात्म्यांच्या त्याग, कळकळ, सर्वस्वाची होळी

मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी पशुवत होई

 

जेव्हा पेटतो वणवा

होते कुणाचे घर बेचिराख,

विझतो कुठल्या घरचा दिवा, होतात पोरकी मुले,

स्वार्थापुढे तमा नसे यास तयांची

माजती ही सैतानाची बाळे

 

समता, शांती, अखंडता

देती तडा महात्म्यांच्या या ब्रिदास

माजवूनी समाजात वादंग

करिती महान आत्म्यांचा भ्रमनिरास