लफंगे धर्मगुरू

 

T.V. वरचे प्रवचन ऐकता ऐकता माझी आई मला म्हणाली

अरे मला या बाबांच्या दरबारात घेऊन चल, बघ किती विद्वान संत आहेत,

शांततेत सर्वांच्या समस्या सोडवितात ते

पाहील मी त्या बाबांकडे अन खोपड आउट झाल

तो बाबा होता नवरदेवासारखा सजला

अन जाहिरातीतल्या मॉडेल सारखा देहयष्टीने धजला

आईवर मी रागावलो अन म्हणालो हा कुठल्या angle नी बाबा दिसतो,

तंदुलतनु अन भासतो कलाकारासदृश

बघ स्वतःकडे

या तोतयांचे बोल ऐकून, जमानाभराच्या पोथ्या वाचून, उपासतापास करून झाली तू कृश

अन तो बाबा मात्र तुमच्याकडून माळा जपून, लाखो जपांचा विक्रम करून घेऊन

साऱ्या जगात प्रसिद्ध होऊन कमवून राहिला पैसा, प्रसिद्धी अन यश

नको बळी पडू यांच्या अभिनयाला, नको ऐकू यांचे बोलवचन

जेव्हा इच्छा होईल, वेळ मिळेल तेव्हाच कर नामस्मरण

देवाला अवडंबर नको, नको चोवीस तास माळ जपणे,

सकाळसंध्याकाळ तासनतास देवासमोर पूजा करत बसणे

अस करशील तर देव करेल तुला मानसिक रुग्ण

अन देईल जमानाभरायचे दुखणे

ना हे बाबा लोक तुझ्या कामी येतील ना यांचे आयुर्वेदिक औषध घेणे

फक्त यांच्या बोलण्यातील जेवढ चांगल तेवढच अंगीकार

उपास, माळा जपण, यांना देणगी देण हे मात्र दूर सार

 

मला कुणाच्या देवधर्मात दखल दयायची नाही हो

पण काय करू, जेव्हा हे लफंगे धर्मगुरू मांडतात देवाचा बाजार

तेव्हा अंगाचा होतो तिळपापड फार