भगवंता तू मोठा लबाड
येती दूरदूरून भक्त्त तुझ्या दर्शना
अपुले दुःख, संकटे, गाऱ्हाणे सांगण्या
उपासतापास करुनी नामगजर करिती तुझा
तू मात्र पाहुनी परीक्षा धरिशी वेठीस त्यांना
तुझ्या नावावर अन भंडाऱ्यातील अन्नावर
ऐतखोर, मस्तवाल झालेल्या भिकाऱ्यांना
न करता कष्ट खावू घालशी पोटभर
भगवंता तू हि मोठा छाकटा
दिन–हीन गरिबांची घेशी सत्वपरीक्षा
धनदांडगे अन बलपुरुषांशी घेशी निमुळता