किती माणूस लबाड आहे बघा
मंदिर, दर्गा, चर्चपुढे कान पकडून, उठबशा काढून
मोकळा होतो आपल्या कृत्याची माफी मागून, दर्शन करून
जाता त्या धर्मस्थळा जवळून त्यापुढे जोरात वाजवून गाडीचा हॉर्न,
वाहनाचा वेग कमी करून, हात ओठाला व डोक्याला लावून
पुढे जाई परमेश्वराचे नामस्मरण करून
फक्त देव, अल्ला, गॉडसाठीच आपल्या हृदयात आपुलकी
त्यांनाच दाखवितो आपण आपली माणुसकी
थोडासा कुणाला धक्का लागता आपण भांडतो त्याच्याशी,
भरधाव वेगाने वाहन चालवून खेळतो कुणाच्या जीवाशी
कुणी जगो अथवा मरो काही घेणे–देणे नाही त्याच्याशी
आपला मतलब फक्त आपण सुखी राहण्याशी
फारच विचित्र आहे आपली विचारसरणी
मंदिर, मस्जिदी, गिरिजाघरी बसतो तोच देव असतो
नाही त्याला मान दिला तर तो रुसतो, हेच ध्यानात ठेवतो
म्हणून आपण त्याची खुशामत करतो
आपण माणसे आपला जात–धर्म पाहून स्वतःला श्रेष्ठ समजतो
आपल्या सुख–संपत्तीच्या भरवश्यावर माजतो
कुणाचाही जीव घेतला तरी काही होत नाही
चांगला वकील लावून आरामात सुटतो असे मानतो
आपल्या जातीला आहे संरक्षण म्हणून इतरांकडे छाती काढून पाहतो
अन फसविण्यासाठी जात–धर्म करायचा पुढे हे जाणतो