लाखोंचा पोशिंदा

 

खरच परमेश्वरा तू फार दयाळू आहेस, लाखोंचा पोशिंदा आहेस

मंदिर, मस्जिद, चर्च ही तुझी धर्मस्थळे

लुळे, पांगळे, बेसहारा यांच्यासाठी आसरा आहे

जेव्हा यावे तुझ्या दरबारी, दिसे या लोकांची मांदियाळी

कोणी काही एक रुपयाची मदत करतो का म्हणून दिसे दुःखात, कण्हत

येणाऱ्या भक्त्तांकडे शुष्क डोळ्याने पाहत बसलेले भिकारी तुझ्या दारी

 

यांना कोणी हिणवो वा खावू न घालो

परंतु अन्नदान केल्याने आपली ईडापीडा टळतेहे जाणून

भक्तजन वाटती ब्रेड, बिस्किटांचे पुडे वा शिजवलेले अन्न तुझ्या पायी

हासून, उदार होऊन, आपल्या हस्ते ते त्यांना खाण्यास देई

त्या रूपे नकळतच अशा उपेक्षितांच्या खाण्याची सोय होई

 

जरी मानवता समजून भक्तमंडळी हे कार्य न करी

परंतु तुला चढविलेला भोग समजून

निदान या निमित्तान तरी रंजल्यागांजल्यांच्या पोटात दोन घास जाई

 

भगवंता खरच तू खूप हुशार आहेस रे

आणून संकटे मानवावर, या अज्ञानी जनांना दाविती

साडेसाती, महादशा वा पितरदोषाची भीती

करून घेऊन यांच्याकडून सत्कर्मे, पाजावयास लाविती कुत्र्यांना दूध

अन घालावयास सांगशी गायींना चारा

कुणास ही उपाशी तू ना निजविशी

जितके आहे ज्याच्या नशिबी तितके त्यास तू देशी