बुटावर लेबल, शर्टावर लेबल, लेबल हर एक गोष्टीवर
जातीच लेबल कायमच कोरल मनुष्य जातीवर
हा अमक्या जातीचा तो टमक्या जातीचा
विभागणी केली माणसाची
स्वार्थासाठी माणसानच टांगली लक्तर माणुसकीची
टाकाऊ माल म्हणूनी इथला माणूस सदैव हिणवला
सेल उभारून जागोजागी पायानी तुडविला
एकावर एक फ्री या थाटात मिरविला
मंदीच्या लाटेगत त्यास कवडीमोल केला
हलक्या भारी दर्जाची पोत लावून तयाला
सारले दूर माणसाने माणसाला
“युज अँड थ्रो” च्या संस्कृतीसंगे कहरच केला
अहंभावापायी माणूसच माणसास भूलावला
एक दिवस कधी न यावी स्थिती बुडत्या कंपनीगत
न लोप पावावी संस्कृती मनुष्यजातीसगट