वाहत गेलो मी

दारूच्या नशेत वाहत गेलो मी

जीवनाचा अंत पाहत गेलो मी

जाणीव होती याची, पण कळत नव्हत मला

दारूच्या नशेन झालो होतो पुरा वेडा

जळी, स्थळी, पाषाणी दिसत होती दारू

तिच्या मोहापायी नव्हतो करू शकत काही

रंग बिरंगी दारू आणे क्षणाची नशा

उतरल्यावर वाटे भकास चारी दिशा

क्षणाची नशा करे मती गुंग

आयुष्यभर टाकाया लावे वेडेवाकडे पाऊल

दारू हाच वाटे आपला एक सहारा

उकिरडा अन गटारा नित्याचाच निवारा

कईकदा केला प्रयत्न कि सुटाव यातून

पण हि जालीम अशी बसली बिलगून

प्याली, प्याली, प्याली आयुष्यभर दारू प्यायली

एक दिवस मात्र हिच मला गिळून गेली