रोडवर उभे राहता दिसे मोठे मजेदार चित्र
ट्रक, कार, लग्झरी बसेसच्या मागे पुढे
दिसे लिहिले नाव राम, रहीम, गॉडचे,
कुणाच्या गाडीवर मागच्या काचेवर लक्ष वेधे
अभंगाच्या ओळी, कुराणातली आयते, बायबलमधली छंदे
वा दिसे आपण ज्या धर्माला मानतो त्या धर्मातील
देवांची, पीर, संतांची सुंदर रेखाटलेली रेखांकने
कुठल्या गाडीवर शिवराय, महाराणा प्रताप वा
राणी लक्ष्मीबाई दिसे चितारलेले
तर कुणाच्या गाडीवर सुंदर निसर्गचित्र असे काढलेले
ट्रकच्या मागे ही दिसे शेरोशायरी अन सुविचार लिहिलेले
बरे जे चालविती हया गाड्या त्यांच्या मस्तकावर असे हळद, कुंकू, चंदनाचे टिळे,
कोणाच्या गळ्यात मजारीवर पिराने मंतरून दिलेले ताबीज मिळे,
तर कुणाच्या खिशातल्या की–चेनवरच्या पवित्र क्रॉसवर लक्ष खिळे,
गाडीतल्या एअर कंडिशनरच्या थंड हवेत आपापल्या प्रभूचे नामस्मरण चाले
अन दिसता आपल्या प्रभूचे धर्मस्थळ दर्शन कराया त्यांचा हात हाले
मनगटावर, छातीवर, दंडावर दिसे देवाचे नाव व चित्र Tatoo करून लिहिले
राम, रहीम, गॉड यांच्यापुरतीच मर्यादित भक्ती आपली
या देवांनी लिहिलेल्या धार्मिक पुस्तकातील काही ओळी
“किती आमचे देव श्रेष्ठ“, हया अहंभावापायी, जागा मिळेल तेथे आम्ही छापली
पालापाचोळा समजून जनांना, बेदरकारपणे चालवू आपली वाहने,
कोणी येता त्याखाली त्यासी नसे आपल्याला सुतसोयरे
अंगा–खांदयावर, गाडीच्या चार ही बाजूंवर लिहून नाव प्रभूचे
अन गाडीतील साधू, सेंट, पिराच्या फोटो समोर लावून उदबत्ती
मानव समजे त्यास आता नसे कुठल्याच संकटाची भीती
आणि आले जरी संकट त्याची काळजी आपले प्रभू वाहती
समजून “साऱ्या कायनातीचे मालक“, “परमेश्वर आपला पाठीराखा“,
without license लोक आपल्या गाड्या सुसाट पळविती