T.V. वर कोणत्याही धर्माचे धार्मिक प्रवचन ऐकावे तर
डोकच गरागरा फिरायला लागते
जेव्हा कोणी भाविक तेथील साधू–संत, मुल्ला–मौलवी, पाद्री लोकांना
आपल्या समस्या सांगतात की “माझा लहान मुलगा अभ्यास करीत नाही,
दिवसभर खेळत राहतो, हा पुढे जाईल की नाही“
तेव्हा ही धार्मिक साधु मंडळी उगीचच बदकासारखे डोळे मिटून
जणू साक्षात देवाने, अल्लाने, प्रभू येशूनेच यांच्या कानात उपाय सांगितला
या आविर्भावात सांगतात
“तू तुझ्या मुलाला हनुमान, अल्लाचे, प्रभू येशूचे
दररोज दहा वेळा नाव घ्यायला सांगत जा व त्यानंतर त्याला
हनुमान चालीसा, कुराण, बायबलमधल्या काही ओळींच पठाण करायला सांगत जा
म्हणजे तुझ्या मुलाचा उनाडपणा कमी होऊन तो पुढे सज्जन गृहस्थ बनेल“
अरे हे काय चाललय यार
ठीक आहे त्या धर्मगुरूच डोक ठिकाणावर नाही कारण त्याला डोकच नसत
पण तुम्ही त्यांच म्हणन ऐकणारे सुध्दा बिनढोक होता
अरे लहान मुलाला शाळेची प्रेअर सुध्दा म्हणता येत नाही,
‘अ‘, ‘ब‘, ‘क‘, ‘ड‘ वाचता येत नाही तो खरच
हनुमान चालीसा, कुराण, बायबलमधल्या ओळींच पठण करणार आहे का ?
अहो काही तरी डोक्याने विचार करा
मित्र हो, नका हो अशा धूर्त लोकांच्या आहारी जाऊ
प्रगल्भ बना
आपण चंद्रावर तर केव्हाच गेलो आहोत
आता सूर्य ही काबीज करायला निघालो आहोत
परंतु असा अतिदैववाद करून मूर्खपणा करतो आहे
अरे लहान मुल खोडसाळ असतातच
त्या लहान वयात मस्त्या नाही करणार तर कधी करणार
त्यांच वयच असत ते
थोड मोठ झाल की बरोबर कळू लागते
पण म्हणून का आपण त्यांच्या बालमनावर देवधर्माचा मारा करून,
त्यांच आयुष्य उध्वस्त करून, त्यांना अंधश्रद्धेत लोटायच
बंद करा असे घाणेरडे धार्मिक कार्यक्रम पाहणे
त्यापेक्षा विज्ञान सांगणारे कार्यक्रम पहा व विज्ञानवादी बना