देवाच्या नावावर आपण ही विदूषक बनतो
देव जसा सजतो तसेच आपण ही रंगतो
त्याच्यासारखे कवच कुंडले धारण करून
कपाळ, कान, गळा, हाताला
गंधाक्षत, कुंकू, हळद माखतो
दुकानात गल्ल्यावर बसल्यावर उदबत्ती ओवाळून
मुखाने देवाचे नाव उच्चारतो
अन लोकांच्या अंगावर शिवराळ भाषेत खेकसतो
उच्च शिक्षित होऊन रस्त्यावर कुणाच्या अंगावर उडेल असे थुंकतो
अन कोणी बोलताच शिव्या देऊन भांडणावर येतो
व्वा रे यांचा देव अन शिक्षण !
जर असेल देव तर त्याला एकच विनंती
करा हो या विदूषकांपासून सामान्यजनांच रक्षण